vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रूग्ण व नातेवाईकांची गैरसोय करणाऱ्यांवर कारवाई यंत्रणांना सौहार्दपूर्ण वर्तन करण्याचे निर्देश- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

रूग्ण व नातेवाईकांची गैरसोय करणाऱ्यांवर कारवाई यंत्रणांना सौहार्दपूर्ण वर्तन करण्याचे निर्देश- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

      मुंबई प्रतिनिधी: रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रूग्ण व नातेवाईकांसोबत सौहार्दपूर्ण वर्तन करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना निर्देशित करण्यात आले असून सर ज.जी. समुह रुग्णालयातील समाजसेवा विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

            विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विलास भुमरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ बोलत होते.

            मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, जे जे रुग्णालयातील समाजसेवा विभागातील अधिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत संस्थेकडे तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने संस्थास्तरावर चौकशी समिती गठीत करुन चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल विचारात घेवून अधिष्ठाता, सर ज.जी. समुह रुग्णालय यांनी समाजसेवा अधिक्षक संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार आहे अशा कर्मचाऱ्यांना यापुढे कर्तव्यात कसुर होणार नाही अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

            तसेच जे कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आहेत अशा कर्मचाऱ्यांची रजा विनावेतन करण्यात आलेली आहे. दोषी आढळून आलेल्या समाजसेवा अधिक्षकांपैकी २ कर्मचांऱ्यांची वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या २६ जून २०२६ रोजीच्या आदेशान्वये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. सचिव, आयुक्त यांना यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर, तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

मुंबई येथे श्री ष ब्र १०८ श्रीगुरु डॅा. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट!

उन्हाळी भुईमुग पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

कोपरखैरणे परिसरात 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत दिला मतदानाचा संदेश*