vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीम.विजया चामे यांचे रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य

श्रीम.विजया चामे यांचे रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य

पनवेल प्रतिनिधी

श्रीम.विजया चामे यांनी आपल्या कर्तव्यकाळात प्रशासकीय जबाबदारी सक्षमपणे पार पाडली व त्यासोबतच माणुसकीच्या नात्याने आणि रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

 आपत्कालीन परिस्थितीत तत्परता (जीवनरक्षक कार्य): जानेवारी 2025: भरारी पथकात कर्तव्य बजावत असताना, एका भीषण अपघातातील जखमी मुलाला कोणतीही वेळ न घालवता कार्यालयाच्या शासकीय वाहनातून तात्काळ एमजीएम (MGM) हॉस्पिटलमध्ये दाखल केले व उपचार सुरू होईपर्यंत पाठपुरावा केला. मे 2025: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर रात्रीच्या वेळी भरारी पथकाचे काम करत असताना, एका अपघातग्रस्त टेम्पो चालकाला अॅम्बुलन्सच्या साहाय्याने एमजीएम हॉस्पिटलमध्ये वेळेत दाखल करून त्याचे प्राण वाचवण्यास मदत केली.

रस्ता सुरक्षा बाबत जनजागृतीः रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्याच्या उ‌द्देशाने त्यांनी विविध कंपन्या, शाळा, महावि‌द्यालये आणि निवासी वसाहतींना भेटी दिल्या. तेथे नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देऊन रस्ता सुरक्षेबाबत प्रभावी मार्गदर्शन केले व अपघात कमी होण्याचे दृष्टीने विशेष प्रयत्न केले.

 महिला सक्षमीकरणः जानेवारी महिन्यात त्यांनी 250 हून अधिक दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा चालक महिलांची रस्ता सुरक्षा रॅली’ यशस्वीपणे आयोजित केली. या उपक्रमाद्वारे महिला चालकांचा कार्यालयामार्फत गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

विशेष कामगिरीबाबत गुणगौरवःश्रीम. विजया चामे यांचे उल्लेखनीय कार्याचेच फलीत म्हणून परिवहन विभागाच्या वर्धापनदिनी आयोजीत सोहळयात दि. 01.03.2026 रोजी मा.ना.परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. ही बाब प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद आहे.

नाव- श्रीमती विजया धर्मेंद्र चामेपदनाम- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलमोबाईल क्रमांक: 7769876124

०००००००

संबंधित पोस्ट

शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भुमिपूजन…

vishwatmaklokswamivarta

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेला राज्यशासनाच्यावतीने गती-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार