vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन

सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन

 

           छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी):- सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, वीर पिता व अवलंबित यांची सैनिक कल्याण कार्यालयातील, सैनिक विभागातील तसेच केंद्रीय सैनिक बोर्डातील सर्व कामे येत्या एका महिन्याच्या काळात ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी सैनिक कल्याण विभाग पोर्टल वर नोंद करुन अर्ज व अपलोड केलेल्या सर्व संबंधित कागद पत्राची प्रत व दोन (२.५X२ सेमी) साईजचे लाल पार्श्वभूमी असलेले फोटो जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे द्यावे. त्यामुळे दि.१ फेब्रुवारी पासून शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास अडचण उद्भवणार नाही. ऑनलाईन नाव नोंदणी (On Line Registration) करण्यासाठी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन DSW Portal वर Register करावे त्यानंतर Register ESM / Register Depandent / Register Orphan / Register widow मध्ये जाऊन आपली नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ०२४०- २३७०३१३ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर, पावसाळी अधिवेशन 2026 विधान परिषद कामकाज-

कर्जतजवळील ‘सुकून एम्पायर – हलाल टाउनशिप’ या धर्माधारित गृहप्रकल्पांवर बंदी घाला !* – हिंदु जनजागृती समितीची मागणी*कर्जत येथे ‘हलाल टाउनशिप’ विरोधात आंदोलन*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना

vishwatmaklokswamivarta

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन