vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात प्रभावी लढाठाणे जिल्ह्यात १४–१५ वयोगटातील सर्व मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण राबविणार

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात प्रभावी लढाठाणे जिल्ह्यात १४–१५ वयोगटातील सर्व मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण राबविणार

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – महिलांमधील गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण मोहीम ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलींना ही लस पूर्णपणे मोफत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली

जिल्हा लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की “जिल्ह्यातील १४ ते १५ वयोगटातील एकही मुलगी HPV लसीकरणापासून वंचित राहता कामा नये.”  ही मोहीम मुख्य कार्यकारी मनोज रानडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणार असून लसीकरणाचे संपूर्ण नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या देखरेखीत करण्यात आले आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग — महिलांसाठी गंभीर धोका• भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे.• ९९.७% प्रकरणे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतात.• हा विषाणू प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो.HPV लसीचे महत्त्व• HPV लस अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे.• ही लस घेतल्यास जवळपास ९९% गर्भाशय मुखाचा कर्करोगाचा धोका कमी होतो. १४–१५ वयात दिलेली लस सर्वाधिक प्रभावी ठरते.

लसीकरणाची अंमलबजावणी,जिल्ह्यातील सर्व मुलींचे लसीकरण खालील ठिकाणी केले जाईल:• प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)• ग्रामीण रुग्णालये• उपजिल्हा रुग्णालये शाळा-आधारित मोहीमआरोग्य विभाग शिक्षण विभागाच्या सहकार्याने• शाळांतील विद्यार्थिनींची नावे संकलित करेल, पालकांमध्ये विशेष जनजागृती करेल

प्रशिक्षण-सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि PHC पातळीवरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अभियान कालावधी-लस उपलब्ध होताच ३ महिन्यांच्या विशेष अभियानाद्वारे लसीकरण केले जाईल. त्यानंतर पात्र मुलींचे लसीकरण नियमित लसीकरण सत्रांमध्ये केले जाईल.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, “HPV लसीकरण ही मुलींच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. प्रत्येक पात्र मुलीपर्यंत लस वेळेवर पोहोचली पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृती आवश्यक आहे.”यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, बाह्य संपर्क अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ. मृणाली राहुड तसेच सर्व महानगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४–१५ वर्ष वयोगटातील मुलींना HPV लस घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

000

Regards,

संबंधित पोस्ट

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा· पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे· वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा· खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा

मुंबईत उद्यापासून होणार ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 चे आयोजन

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांच्या प्रतिमेस सदस्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

कृत्रिम वाळू प्रकल्पांना सवलती देऊन प्रोत्साहन*जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मितीला चालना*जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी