vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

        सांगली, प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025, विविध आंदोलने, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 30 नोव्हेंबर 2025 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

   हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

vishwatmaklokswamivarta

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५०हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश !मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी!