vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

जालना (प्रतिनिधी) : जालना शहर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा) व मनसे युती उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ दि. ०८ जानेवारी गुरुवारी दुपारी ०२:३० वाजता गांधी चमन, जुना जालना येथील प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाजेर काझी, आमदार विक्रम काळे, आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव आर्दड, माजी आमदार सुरेशकुमार जेलिया, माजी आमदार शिवाजीराव चौथे, महिला प्रदेश सरचिटणीस शकुंतलाताई कदम, प्रदेश सरचिटणीस रविंद्र तौर, युवक प्रदेश सरचिटणीस धैर्यशील चव्हाण, प्रदेश सचिव आणासाहेब खंदारे, मनसे जिल्हाध्यक्ष रविंद्र राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, परतुर मंठा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब गोरे, महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या भव्य जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, शहरजिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सोपान तेलगड, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष शाह आलम खान, शहर जिल्हा कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर घेवंदे, शहर युवक अध्यक्ष प्रविण शिंदे, अध्यक्ष कामगार विभाग सतिष वाहुळे आदी पदाधिकांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

vishwatmaklokswamivarta

राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा;उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील