vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

लातूर, प्रतिनिधी : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. काल रात्री पासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

नागरिकांनी कोणतेही धोकादायक प्रवास किंवा शेतीची कामे टाळावीत. आपल्या कुटुंबाची आणि गाव-शहराया सुरक्षेसाठी करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून तातडीची मदत पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जळकोट तालुक्यातील बेलसांगवी येथे पाण्याचा वेढा पडलेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहमदपूर येथील चिलखा बॅरेजवर अडकलेल्या मजुरांची स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांनी यशस्वीपणे सुटका केली आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घाबरून न जावू नये. पाऊस कमी झाल्यानंतर शेती, जमीन, घर आणि जनावरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील. राज्य शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी पालकमंत्र्यांनी दिली. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

*****

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव’- मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ८ सप्टेंबर रोजी महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कोल्हापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना शेती, पिके, पशुधन, घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

नांदेडच्या भूमीवर होणारा शहिदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta

डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर-पालकमंत्री*अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन वाहने दाखल;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण..