
2000 च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे- भारतीय रिझर्व बँक
राज्य प्रतिनिधी
नागरिकांना ही शेवटची संधी असणार आहे याकरिता त्यांनी आपल्याकडे असलेल्या 2000 च्या नोटा बदलून घेण्याची आवाहन रिझर्व बँक ऑफ इंडिया ने केले आहे
2000 च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती Reserve Bank of India ने दिली आहे. 19मे दिवशी आरबीआय ने नागरिकांना 30 सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेण्याचं आवाहन केले होते. पण त्यामध्ये आता अजून सात दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. तुमच्याकडे 2 हजारच्या नोटा असतील तर त्या बॅंकेत जमा करा अथवा बदलून घ्या असं आवाहन आरबीआयने केले आहे.



