vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-     ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त साधारणत: 20 लाखाहून अधिक नागरिक देशापरदेशातून पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील ओवे मैदान,सेक्टर 29, खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 या दोन दिवसात येण्याचा अंदाज असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या विषयीच्या आढावा बैठकीत सांगितले.

          ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीमा, निबंध वक्तृत्व चित्रकला अशा विविध स्पर्धा सातत्याने आयोजित करण्यात येत असून शाळा, महाविदयालये, विविध संस्था, नागरिक यांच्या सहभागातून शहरामध्ये कार्यक्रमाची मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. होर्डिंग्ज, बॅनर्स, पॅम्प्लेट्स या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे.

          या अनुषंगाने बुधवार दि.2 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता विष्णुदास भावे नाटयगृह येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार – प्रसिध्दीसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये मान्यवरांसह लेवा संगत, सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व वारकरी अशा नऊ संप्रदायांमधील अनुयायी तसेच विदयार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी असणार आहेत.  या सोबतच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देशभरातून ठिकठिकाणाहून कार्यक्रमासाठी येणाऱ्या 2 हजारहून अधिक नागरिकांची निवास व्यवस्था अनुषांगिक सुविधांसह करण्यात आलेली आहे.  कार्यक्रमस्थळी बाहयरुग्ण्‍(ओपीडी) सेवा कक्ष असणार असून त्यामध्ये 25 डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

          त्याचप्रमाणे 106 एनएमएमटी बसेस कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांकरिता तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबतच्या नियंत्रणासाठी एनएमएमटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

          भाविकांच्या सोयीसाठी 1000 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी जेटींग मशिन, सक्शन युनिट कार्यरत असणार आहेत.

          ओवे मैदानाचा भव्यतम परिसर लाखो नागरिकांनी फुलून जाणार असल्याने 500 हून अधिक स्वच्छताकर्मींची व्यवस्था आवश्यक साहित्य व साधन सामुग्रीसह करण्यात आलेली आहे.

          या कार्यक्रमानिमित्त लाखो भाविक नवी मुंबईतील रस्त्याने ये-जा करणार असल्याने स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष्‍ा देण्याचे निर्देश आयुक्तांनी या बैठकीप्रसंगी दिले. तसेच मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरणावरही भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

          27 फेब्रुवारी रोजी सायं. 4 वाजता सीबीडी बेलापूर येथील गुरुद्वारापासून ओवे मैदान येथील कार्यक्रम स्थळापर्यंत नगर कीर्तन या विशेष उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असून यामध्येही मोठया प्रमाणावर नागरिकांच्या सहभागातून प्रचार प्रसिध्दी केली जाणार आहे.या बैठकीस उपस्थित नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी तसेच एपीएमसी मार्केट व्यापारी असोसिऐशनचे पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम समाजमूल्ये जपणारा व सामाजिक एकात्मतेची भावना रुजविणारा असल्याने या कार्यक्रमाच्या आयोजनात विविध खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी तसेच अन्नधान्य पुरवठ्यासाठी मोठया प्रमाणात सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.

          याप्रसंगी हिंद – दी- चादर कार्यक्रमाचे नमुंमपा मुख्य समन्वयक तथा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व इतर नोडल अधिकारी विभागप्रमुख तसेच धर्मजागरण मंचचे कोकण प्रांत प्रमुख महेंद्र रायचुरा, रायगड उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा “हिंद दी चादर”चे समन्वयक श्री.रविंद्र राठोड,उपस्थित होते. त्यांनीही या बैठकीमध्ये सर्व समाजांना एकत्र घेउुन आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

00000

संबंधित पोस्ट

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले

vishwatmaklokswamivarta

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन,रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम

vishwatmaklokswamivarta

केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार – प्रतापराव जाधव > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट > घाबरु नका, लवकरच निदान 

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका-प्रसिध्दीकरिता – व्यापक जनसहभागातून नवी मुंबईत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा  

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta