काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाचं राज्यात आंदोलन…
राज्य प्रतिनिधी-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सलतान यांची तुलना केल्याप्रकरणी भाजपाकडून निषेध. आणि राज्यात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन. करण्यात येत आहे आणि
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सलतान यांची तुलना केल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरुन दूर करत त्यांचा राजीनामा घ्यावा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी. भाजपा या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आपल्या वक्तव्याची मोडतोड करुन अयोग्य पध्दतीनं सादर करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.