vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अग्निपथवर होणार मोठा निर्णय? लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद

अग्निपथवर होणार मोठा निर्णय? लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद…

नवी दिल्ली बातम्य

सध्या अग्निपथ भरतीच्या योजनेवरून देशभर हिंसाचार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ होत असून अनेक तरूण रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातून होत असलेला विरोध लक्षात घेता लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची आज एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुपारी दोन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी तरूणांनी आंदोलन केले असून जाळपोळ केली आहे. यामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशमधून या निर्णयाला जास्त विरोध केला जात आहे.

दरम्यान केरळ राजस्थानसहित अनेक राज्यांनी ही योजना रद्द करावी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. पण सरकारने या योजनेसंदर्भात अजून काही निर्णय जाहीर केले असून त्यामध्ये तरूणांना फायदा होणार आहे असं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

 

दरम्यान बिहामध्ये हा वाद जास्त उसळला असून पटना मध्ये सुरक्षा दलांच्या जवानांना तैनात केलं आहे. कालपर्यंत जवळपास ४६ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दानापूर येथे रेल्वेची तोडफोड केल्याच्या आरोपावरून जवळपास १७० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान देशभर उसळलेल्या या हिंसाचारामुळे बिहारमधील १२ जिल्ह्यात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये रोहतास, लखीसराय, औरंगाबाद, कैमूर, भोजपूर, बक्सर, सारण, समस्तीपूर, बेगूसराय, नवादा, चंपारण आणि वैशाली या जिल्ह्यांचा सामावेश आहे

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन झाले त्यांनी शहरात अनेक प्रकल्प आणि विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.   

vishwatmaklokswamivarta

वसईतील  अनाथ मुलीच्या 3  जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने सर्वत्र संताप, प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी दोघांना ताब्यात.

बॉलीवूड अभिनेता: मिथुन चक्रवर्तीची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल; ICU मध्ये सुरु आहेत उपचार…

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!सनातन धर्माच्या रक्षणार्थ संघटित होण्याचा हजारो हिंदूंचा निर्धार !* भगवे ध्वज, टाळ-मृदुंग घेतलेले वारकरी, रणरागिणींची स्वसंरक्षण प्रात्याक्षिके, पारंपारिक वेशभूषा, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी दिंडीचे आकर्षण !

vishwatmaklokswamivarta

अमित शहा यांनी नाही,काँग्रेसनेच अनेकदा* *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,मोदी – शहांच्या नेतृत्वात भाजप एन डी ए सरकार ने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारक कामे मार्गी लावून सन्मानच केला आहे.*

vishwatmaklokswamivarta