vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी भेट..

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी भेट..

गडचिरोली : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुधाकर अडबाले यांनी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान डीसीपीएस/एनपीएस निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या जुन्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ सेवा जोडण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्याचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला. यासंदर्भात तात्काळ विभागीय परिपत्रक काढण्यात यावे, अशी मागणी आमदार अडबाले यांनी लेखी निवेदनाद्वारे अवर मुख्य सचिवांकडे केली.

तसेच राज्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांची थकीत देयके त्वरीत अदा करण्यात यावीत, यावरही सकारात्मक चर्चा झाली. प्राध्यापक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाद्वारे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विदर्भातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयांसमोर दि. १० मार्च २०२६ रोजी आयोजित धरणे/निदर्शने आंदोलनाबाबतचे निवेदनही अवर मुख्य सचिवांना देण्यात आले.

या वेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वर्धा जिल्हा कार्यवाह श्री. महेंद्र सालंकार व चंद्रपूर जिल्हा कार्यवाह श्री. दीपक धोपटे उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

विधिमंडळात मंजूर होणारे कायदे समाजाच्या हिताचे प्रतिनिधीत्व करतात – आमदार सुधीर मुनगंटीवार विधानभवन येथे ५१ वा संसदीय अभ्यासवर्ग

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशी निमित्त राज्यपालांची श्री शृंगेरी शंकर मठाला भेटपंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

जयश्री सोनकवडे यांची जातीय द्वेषभावनेतून बदनामी करणाऱ्या विरूध्द कारवाई करा महिला कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांची सामाजिक मंत्र्याकडे मागणी.

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”