vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानपरिषदकामकाज….

विधानपरिषदकामकाज

विशेष प्रतिनिधी -विधानपरिषदकामकाज

बिबट्यांचा समावेश वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची-१ मधून अनुसूची-२ मध्ये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे ५डिसेंबर २०२५ रोजी सादर करण्यात आला. मात्र, केंद्राकडून मंजुरी न मिळाल्याने केवळ महाराष्ट्रासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा पर्याय शासन विचाराधीन असून त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज

#दावोस येथे झालेल्या करारांबाबत (एमओयू) सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी राज्य शासन लवकरच ‘भगवी पत्रिका’ सादर करणार आहे. या पत्रिकेत २०२२ ते २०२५ दरम्यान झालेल्या करारांची अंमलबजावणी, किती प्रकल्प कार्यान्वित झाले, किती प्रक्रियेत आहेत आणि कोणते प्रकल्प मागे आहेत याचा तपशील दिला जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज

हमीभाव खरेदीत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी देशात अव्वल स्थान मिळवले असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज,

शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कलम २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज,सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २७ हजार ९४४ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यातील रस्ते विकास कामे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.

 

संबंधित पोस्ट

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

कन्नड येथे पथदर्शी प्रकल्प; शहरी भागात ड्रोनद्वारे जमिन मोजणी‘नक्शा’साठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार   

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील ‘मुक्तीपथ’ अभियानाचा देशाला आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनातून साकारले अभियान