vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश-प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश-प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी ‘’गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून आम्ही किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहोत. आपल्या मुलींचे संरक्षण करणे हे आपले नैतिक आणि सामाजिक दायित्व आहे. कॉर्पोरेट घटकांनी CSR च्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढ्याला बळ द्यावे.’,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा विस्तार सुरू असून, पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही अधिकृत समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सामंजस्य करार (MOU) स्वाक्षरीत करण्यात आला असून, लवकरच जिल्ह्यात अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या मोहिमेला गती देण्यासाठी ‘क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण’ (CreditAccess Grameen) संस्थेने मोलाचा हातभार लावला आहे. त्यांनी आपल्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी २४५० एचपीव्ही लसींचे (HPV Vaccine Doses) प्रायोजन (Support) केले आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण सहकार्यामुळे गरजू मुलींना विनामूल्य लसीकरणाचा लाभ मिळणे सहज शक्य होणार आहे. भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. दर ८ मिनिटांनी एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागत असून, दररोज सुमारे २०० महिलांचा मृत्यू होत आहे. हा कर्करोग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. मात्र, वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो.
 मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश्य म्हणजे लवकर जागरूकता, वेळेवर प्रतिबंध आणि ९ ते १४ वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण करून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा समूळ नायनाट करणे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील लाखो मुलींच्या आरोग्याचे आणि भविष्यातील सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी एक व्यापक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मॉडेल उभे राहत आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये जीविका फाउंडेशन (जीविका हेल्थकेअर) राज्याचा अंमलबजावणी भागीदार (Implementing Partner) म्हणून काम करत आहे. शासनासोबत समन्वय साधून जनजागृती, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि समुदाय पातळीवर विश्वास निर्माण करण्यासाठी जीविका फाउंडेशन सक्रियपणे कार्यरत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य व शिक्षण विभागांच्या समन्वयाने शाळा आणि समुदाय स्तरावर लसीकरण मोहीम, पालकांसाठी जागरूकता सत्रे आणि माहितीपर उपक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे एचपीव्ही लसीबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या समावेशामुळे, १० प्राधान्य जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला अधिक गती मिळणार असून, भविष्यात महाराष्ट्र गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एक आदर्श राज्य म्हणून उभे राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

०००००

संबंधित पोस्ट

विधानपरिषद लक्षवेधी सूचना:कृषी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरास प्राधान्य- मंत्री धनंजय मुंडे

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे.

vishwatmaklokswamivarta

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करावेत

पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाण्यांसाठी अर्ज घेण्यास सुरवात

दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंच खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन- प्रदर्शनात 13 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, वस्तू विक्रीतून 31 हजार जमा…

मुंबईकरांसाठी खुशखबर, ईस्टर्न फ्री वे चेंबुरहून ठाण्यापर्यंत जाणार, खड्ड्यातल्या प्रवासातूनही सुटका होणार?

vishwatmaklokswamivarta