vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ पदांच्या भरती करीता आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत माहे-जुलै-२०२५ मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला व उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधुन सामाजिक व समांतर आरक्षणानुसार आणि गुणवत्तेनुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी देखील पुर्ण करण्यात आली आहे. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in यावर दि.१० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनाकरीता बोलवण्यात येणार आहे त्याबाबत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर स्थळ व दिनांक लवकरच प्रसिध्द करण्यात येईल,असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी कळविले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यावर592 कोटी 34 लाखाची मदत डीबीटीद्वारे वर्ग बुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थींच्या खात्यात 1 कोटींची रक्कम जमा पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…

बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये; कायद्यात कडक तरतूद करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-