vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात-२११७ पैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात-२११७ पैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २११७ उमेदवारांनी हजेरी लावली त्यापैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली,अशी माहिती प्लेसमेंट ऑफीसर डॉ.गिरीष काळे यांनी दिली.

 या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित विविध 47 कंपन्यांचा मेळाव्यात सहभाग घेतला. टोयोटा किर्लोसकर मोटर, अथर एनर्जी, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, मेडी-रिक्रूटर, कल्याण ज्वेलर्स, कॉस्मो फिल्म्स, क्लॅड मेटल इंडिया , बागला गृप ऑफ इंडस्ट्रीस, एस एस कंट्रोल, मेटलमॅन ऑटो, एल. आय. सी., इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सीडी इंडिया लि.,ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि., के आर बेदमुथा टेक्नो असोसिएटस या नामांकित कंपन्या त्यांच्याकडील रिक्तपदे घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यासमवेत स्वयंरोजगार साठी विविध महामंडळ यांचे स्टॉल सुद्धा माहिती देण्यासाठी मेळाव्यामध्ये हजर होते.

या मेळाव्यासाठी २११७ नोकरीइच्छूक उमेदवारांनी उपस्थित राहून नोंदणी केली. विविध आस्थापना कडे ४०८१ मुलाखती पार पडल्या त्यापैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल,मॅन युनायटेड व सीआय आय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजीत करण्यात होता.

०००००

संबंधित पोस्ट

महिलासक्षमीकरणजिद्दीच्या जोरावर ‘ती’ने घडविले प्रगतीचे लेणे..!शहापूरच्या सौ. प्रतिक्षा बेहरे यांचा प्रेरणादायी प्रवास

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

मुंबईत कॉटन ग्रीन येथे केंद्र सरकारच्या कार्यालय संकुलाची उभारणी करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने एनबीसीसी बरोबर केला करार

vishwatmaklokswamivarta

ठाणे सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 47.32 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी फसवणुकीचा लावला छडा ; मुख्य सूत्रधाराला केली अटक

सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बुधवारी हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन