vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

    अमरावती, द प्रतिनिधी: मेळघाटातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीने 10 मोबाईल टॉवरच्या कामाला मंजुरी दिली आहे. यात 9 बीएसएनएल आणि एक ऑप्टीक फायबरच्या टॉवरचा समावेश आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे.

     जिल्हाधिकारी कार्यालयात आज मेळघाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचे संनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी परतवाड्याचे विभागीय वन अधिकारी अनंता दिघोळे उपस्थित होते.

    मेळघाटातील दहा बीएसएनएलच्या टॉवरला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीची मंजुरी आवश्यक असते. त्यानुसार मेहरीआम, बिच्छुखेडा, खोकमार, घाणा, खामदा, धोकडा, मारीता, खंडुखेडा, भुत्रुम आणि चौराकुंड ते चोपन, रंगुबेली ते धोकडा, रूईपठार ते भुत्रुम येथे भुमिगत ऑप्टीकल फायबर टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली.

    जिल्हा सनियंत्रण समितीच्या मान्यतेमुळे बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे. यामुळे नेटवर्कींगमध्ये गती येणार असून मोबाईलची सेवा जलद गतीने आणि विनाव्यत्यय होण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच वनक्षेत्रात करण्यात येणारे जलसंधारण तसेच इतर कामांनाही मंजुरी देण्यात आली.

000000

संबंधित पोस्ट

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

महिला तक्रार निवारण समितीच्या रिक्त पदांसाठी अमरावतीजिल्हा प्रशासनाकडून अर्ज आमंत्रित  15 मार्चपर्यंत मुदत

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नव्याने वसाहती निर्माण झालेला मुजुमदार पार्क परिसरात कागल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छता अभियान..

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta