vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

      अमरावती, प्रतिनिधी : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्साहात साजरा करण्यात आला.

  कार्यक्रमाची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि प्रमुख वक्ते अविनाश दुधे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, अधिक्षक निलेश खटके आणि विधी अधिकारी नरेंद्र बोहरा प्रमुख उपस्थित होते.

   यावेळी प्रमुख वक्ते श्री. दुधे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध वारशावर प्रकाश टाकला. त्यांनी मराठीला दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा गौरवशाली इतिहास असल्याने तिला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला असल्याचे सांगितले. मातृभाषा हे संवादाचे सर्वात श्रेष्ठ साधन असून मराठीतून बोलणारी व्यक्ती जगातील कोणतीही भाषा आत्मसात करू शकतो. भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा किमान पाच टक्के भाग पुस्तके खरेदीसाठी खर्च करावा, असे आवाहन केले.

      निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी वाचनाच्या सकारात्मक परिणामांवर भर दिला. मराठी भाषेचा ऱ्हास थांबवण्यासाठी नवीन पिढीला वाचनाची गोडी लावणे आवश्यक असल्याने मत व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. मडावी यांनी मराठी भाषा जपण्याचा आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा दृढ संकल्प करण्याचे आवाहन केले.

     सिमिता दाभिरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. सुरेंद्र रामेकर यांनी सूत्रसंचालन केले. सलोनी उमाळे यांनी आभार मानले.

0000000

संबंधित पोस्ट

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

जागतिक सुरक्षित इंटरनेट दिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना काम बंद आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन घेतला तीर्थप्रसादाचा लाभ झाला कार्यक्रम संपन्न

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा