vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

जागतिक सुरक्षित इंटरनेट दिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा

जागतिक सुरक्षित इंटरनेट दिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा

रायगड,द प्रतिनिधी):- राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) अलिबाग रायगडचे प्रमुख निलेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालय व महाविद्यालयात जागतिक सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

जागतिक सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा स्तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला NIC इंजिनियर निखिल पडते व विराज चांगे, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी प्रभावी वकृत्व सादर करत सुरक्षित इंटरनेटच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात श्री. निलेश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले. त्याचबरोबर निखिल पडते यांनी इंटरनेटच्या फायदे-तोटे तसेच सायबर सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शन दिले. उपस्थितांनी या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला आणि इंटरनेट सुरक्षिततेविषयी अधिक जागरूक राहण्याचा संकल्प केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट वापराबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.००००

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप-हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

vishwatmaklokswamivarta

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश-प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta