vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता १२ वी परीक्षा; जिल्हाधिकाऱ्यांनी केलीपरीक्षा केंद्रावरील सोई सुविधांची पाहणी..

इयत्ता १२ वी परीक्षा; जिल्हाधिकाऱ्यांनी केलीपरीक्षा केंद्रावरील सोई सुविधांची पाहणी..

 

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२वी) आजपासून सुरु झाल्या.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी प्रत्यक्ष परीक्षा केंद्राची पाहणी करुन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोई सुविधांची पाहणी केली.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १२ वी च्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. इयत्ता १२ वी ची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता १२ वी ची परीक्षा ६३ हजार ९७८ विद्यार्थी देत असून १६१ केंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

  तालुकानिहाय केंद्र व्यवस्था याप्रमाणे-छत्रपती संभाजीनगर ग्रामिण- २० केंद्र ८०८६ विद्यार्थी, छत्रपतीसंभाजीनगर शहर-३३ केंद्र १४ हजार २५५ विद्यार्थी, गंगापूर १४ केंद्र, ६४०० विद्यार्थी, कन्नड १९ केंद्र ६०१२ विद्यार्थी, खुलताबाद १२ केंद्र, ४६२५ विद्यार्थी, पैठण-१६ केंद्र, ५८०२ विद्यार्थी, सिल्लोड-१७ केंद्र ६०५३ विद्यार्थी, सोयगाव-८ केंद्र, ३११४ विद्यार्थी, वैजापूर ११ केंद्र, ५३०१ विद्यार्थी फुलंब्री ११ केंद्र ४३३० विद्यार्थी.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या परीक्षा केंद्रावर सर्वाधिक २८०० विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहे. येथील परीक्षा केंद्र, तेथील शांतता, विद्यार्थ्यांची दप्तरे, पादत्राणे ठेवण्याची सोय, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, वर्गखोल्यांमधील प्रकाश, हवा इ. सुविधांबाबत पाहणी केली. परीक्षा केंद्राबाहेरील पोलीस बंदोबस्ताचाही यावेळी आढावा घेण्यात आला. वाढत्या तापमानाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी प्रतिक्षा कालावधीसाठी सावलीची व्यवस्था, वाहन तळ अशा विविध सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली. परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्राधिकारी व अन्य सहकाऱ्यांशी चर्चा केली

परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश,परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी वगळून अन्य कुणाही व्यक्तिस प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. १०० मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने सुरु ठेवण्यास, सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्र, मोबाईल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडीओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप इ. जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि.११ फेब्रुवारी ते दि.१८ मार्च या कालावधीत अंमलात राहतील असे कळविण्यात आले आहे.

भरारी पथके नियुक्त

या परीक्षा कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त वर्ग १ अधिकाऱ्यांची भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेशही अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसिलदारांच्या नेतृत्वात भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. एका पथका किमान चार सदस्य असतील व एक सदस्य महिला असेल. त्याच प्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथकही नियुक्त असेल व त्यातही एक सदस्य महिला असेल. परीक्षा सुरळीत होण्याच्या दृष्टीने या पथकांनी कारवाई करावी,असे निर्देश देण्यात आले आहेत.०००००

संबंधित पोस्ट

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश – सहपालकमंत्री ना. संजय सावकारे * शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी आणि साधला संवाद* सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग-वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, आरोग्य सेवा सशक्तीकरणासाठीजायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची सहाय्यता

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

छत्रपतीसंभाजीनगरःपर्यटन’, कॉफीटेबल बुकचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विमोचन

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण