vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांची मुदतवाढ

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांची मुदतवाढ

            मुंबई, प्रतिनिधी. ४ : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

            सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करताना येणाऱ्या अडचणींची शासनाने दखल घेतली आहे.

  त्यानुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील तीन महिन्यांची मुदत संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. या कालावधीत उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र संबंधित शैक्षणिक संस्थेकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

      ही तीन महिन्यांची मुदत अंतिम मुदत असून, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

        शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in⁠ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित उमेदवार, शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांनी शासनाच्या निर्देशांची नोंद घेऊन विहित मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन 

अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भाईदर व मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल, अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी येथे ७,२००कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनकेले