vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

राज्य प्रतिनिधी-

 उज्जैन येथील संत आणि हिंदू संघटना यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन करत मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, हिंदू तीर्थक्षेत्रे ही केवळ पर्यटनाची केंद्रे नसून ती हिंदूंची पवित्र व जागृत आध्यात्मिक क्षेत्रे आहेत. ज्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नाही, हिंदू संस्कृती मानत नाही आणि जे गोमांस भक्षण करून हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवतात, अशांना मंदिरात प्रवेश हवाच कशाला? त्यांच्यावर प्रवेशबंदीच हवी, अशी भूमिका मंदिर महासंघाने मांडली.

 

 मंदिरांचे सात्त्विक वातावरण टिकवण्यासाठी आणि पावित्र्य भंग होऊ नये, यासाठी अहिंदूंच्या मंदिर व मंदिर परिसरातील प्रवेशावर तात्काळ बंदी घालणे, ही काळाची गरज आहे. या संदर्भात फोंडा, गोवा येथील मंदिर महासंघाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेसाठी उपस्थित महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड येथील विविध मंदिरांच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत एकमताने ठराव संमत करण्यात आला, अशी माहिती मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

 

 हिंदू मंदिरांच्या रक्षणासाठी ही नियमावली लागू झालीच पाहिजे. तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पावित्र्य नष्ट करणे आणि छुप्या पद्धतीने प्रवेश करणाऱ्या विघातक प्रवृत्तींमुळे हिंदू मंदिरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत, असे घनवट यांनी म्हटले आहे.आपला नम्र,*श्री. सुनील घनवट,*राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ, (संपर्क : ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

मसकऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतले मसकऱ्या गणपतीचे दर्शन

हिंद केसरी कुस्ती स्पर्धांसाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील – जिल्हाधिकारी संतोष पाटील

📢 लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई