vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

सातारा, प्रतिनिधी :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील तब्बल ४९ गावे आणि २६५ वाड्या सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या बाधित भागातील ६२ हजार ८९२ लोकसंख्या आणि ४४ हजार ३४१ पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून सध्या ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

माण तालुक्यातील ३८ गावे आणि २२४ वाड्यांमधील ५१ हजार ७९६ नागरिक व ४१ हजार १४१ पशुधन टंचाईने प्रभावित झाले आहेत. येथे टंचाईवर मात करण्यासाठी १ शासकीय आणि ३२ खाजगी अशा एकूण ३३ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे.खटाव तालुक्यातील ९ गावे आणि ३९ वाड्यांमधील ९ हजार ७२४ नागरिक व ३ हजार १५५ पशुधनाला ५ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

फलटण तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांमधील १ हजार ३७२ लोकसंख्या व ४५ पशुधनाला १ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच एकूण १० विहिरी व १० बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

0000

संबंधित पोस्ट

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र” करिता जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

जागतिक लाफ्टर डे निमित्त धारावीतील लोकांसोबत हास्य डे उत्साहात संपन्न

जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा #पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta