vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या क्रिकेट हंगामाचा श्रीगणेशा

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या क्रिकेट हंगामाचा श्रीगणेशा

ठाणे – प्रतिनिधी-

विजयादशमीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधतते स्पोर्टिंग क्लब कमिटी, ठाणे यांच्या नव्या क्रिकेट हंगामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर क्रिकेट हंगामाला सुरुवात झाल्याने क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या हंगामात खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

क्रिकेट हा केवळ खेळ नसून संघभावना, शिस्त, मेहनत आणि खिलाडूवृत्ती जोपासणारे प्रभावी माध्यम आहे. स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या माध्यमातून सुरू झालेल्या या क्रिकेट हंगामामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून, क्रीडाक्षेत्रातील उत्साहालाही चालना मिळणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेला हा हंगाम खेळाडूंसाठी नव्या उमेद, नव्या संधी आणि आव्हानांची पर्वणी ठरणार आहे. या क्रिकेट हंगामाच्या माध्यमातून खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, खेळातील खिलाडूवृत्ती जपावी आणि संघभावनेतून यश संपादन करावे, अशी अपेक्षा स्पोर्टिंग क्लब कमिटी चे सचिव नगरसेवक ऍडव्होकेट श्री. विकास रेपाळे यांनी व्यक्त केली आहे.

कमिटीचे अध्यक्ष अॅड. कैलास देवल, सचिव नगरसेवक विकास रेपाळे, सहसचिव श्रावण तावडे आणि सतीश नाचणे, नगरसेवक संजय वाघुले, एमसीए निवड समितीचे सदस्य शशी कदम, सदस्य संजय सचदेव, मुकुंद सातघरे, मनोज यादव, चिराग नायडू व शिरीष साठे यावेळी उपस्थित होते.दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या क्रिकेट हंगामातून नवोदित आणि अनुभवी खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, ठाण्यातील क्रिकेटविश्वात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट कैलास देवल यांनी व्यक्त केली आहे.

00000

•

संबंधित पोस्ट

केईएम रुग्णालय स्थित ‘मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर उपस्थित

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

विविध नागरी सुविधा प्रकल्पांची वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी केली महापौर व पदाधिका-यांसमवेत पाहणी..

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर