vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केईएम रुग्णालय स्थित ‘मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर उपस्थित

केईएम रुग्णालय स्थित ‘मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर उपस्थित

मुंबई प्रतिनिधी🏥 केईएम रुग्णालय स्थित ‘मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर उपस्थित होते

👶अपत्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याकरिता इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) प्रसूतीची कृत्रिम गर्भधारणा उपचार पद्धती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय यांच्या माध्यमातून अतिशय माफक दरात उपलब्ध होणार

🗜️कृत्रिम गर्भधारणा (आयव्हीएफ प्रसूती) च्या इतिहासात स्त्री रोग विभागात ४० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कृत्रिम गर्भधारणा सेवेचे पुनरूज्जीवन

📍अपत्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला देण्यात येणारे उपचार हे खासगी क्षेत्रातील उपचाराच्या तुलनेत ५० टक्के सवलतीत उपलब्ध होणार

 📍आयव्हीएफ केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात ५०० ते ६०० रुग्णांना सेवा देणे शक्य होणार आहे.

📍या लोकार्पण प्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, आमदार श्री. अजय चौधरी, विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरी पेडणेकर, नगरसेविका श्रीमती श्रद्धा जाधव, नगरसेवक श्री. किरण तावडे, नगरसेवक श्री. सचिन पडवळ, नगरसेविका श्रीमती सुप्रिया दळवी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत, मा आयव्हीएफ केंद्राच्या श्रीमती अंजली मालपाणी आणि श्री. अनिरुद्ध मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

जालना शहरातील अनेक युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ, एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व कर्ज मार्गदर्शन

राज्यात जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईसह  उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस

ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितींना दिली भेटब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी मार्फत ग्रामस्थांच्या अडचणीं सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार…