vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक लाफ्टर डे निमित्त धारावीतील लोकांसोबत हास्य डे उत्साहात संपन्न

जागतिक लाफ्टर डे निमित्त धारावीतील लोकांसोबत हास्य डे उत्साहात संपन्न

मुंबई प्रतिनिधी-मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक लाफ्टर डे असतो त्यानिमित्त रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सकाळी साडेसात ते नऊ या वेळात फेस्कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी व झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावी बीट दोन यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य योगा प्रशिक्षक श्री मयूर कांबळे यांच्या मार्गदर्शनाने विभागातील लोकांकरिता स्थळ यान शिवराज उद्यान धारावी या ठिकाणी हास्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते हास्य दिनाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली एका मागून एक असे अनेक हास्यविनोद टाळ्यांचा गजर आवाज यांचे सूर कसरतीतून हास्य विनोदाचे फटकारे पार करत लोकांना सामावून घेऊन नियमित हसण्याचे फायदे तणाव मुक्ती जीवन सकारात्मक भावना व नियमित हलका व्यायाम याबद्दल प्रचार व प्रसार करण्यात आला या उद्यानात नियमित फेरफटका व्यायाम व खेळण्याकरिता येणारी मंडळी नकळत या हास्य दिनात सहभागी झाली रोज हसा व हसवा असल्याने तणाव कमी होतो हलक्या व्यायामाने शरीर सुदृढ राहतं हसायला पैसे लागत नाही त्यामुळे तणामुक्त जीवन जगणे सोपे होते याची माहिती देऊन घोषणा दिल्या व शपथ घेतली आम्ही रोज हसणार व हसवणार

 यावेळी फेस्कॉम संलग्न हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी प्रमुख मार्गदर्शक श्री दिलीप गाडेकर धारावी झोपडपट्टी पंचायत बीट दोन सविता शेरखाने संदीप ढवळे गार्डन सुपरवायझर अभिजीत चौकेकर मास्टर मयूर कांबळे उपस्थित होते या कामी जी उत्तर उद्यान विभागाचे व घनकचरा विभागाचे श्री तांबे यांचे सहकार्य लाभले उद्यान्यातील स्वच्छता केल्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला त्याबद्दल त्यांचे आभार कार्यक्रमाचे शेवटी श्री मयूर कांबळे यांच्या जन्मदिवस याच ठिकाणी साजरा करण्यात आला उपस्थित सर्व लोकांना चॉकलेट बिस्कीट वाटप करण्यात आले या सर्वांचे आभार दिलीप गाडेकर यांनी मानले

संबंधित पोस्ट

भिवंडी येथील मुलांमुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व समता पंधरवड्यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

 शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

वीरबालदिवस निमित्त सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत