vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत

     रायगड( प्रतिनिधी: अलिबाग,पेण,मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना सुधारित पिक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिक योजनेत सर्व शेतकऱ्यांना सुधारित पिक विमा योजनेत ३१ जुलै २०२५ पर्यंत अंतिम मुदत असून त्यासाठी फार्मर आयडी व ई पीक पाहणी बंधनकारक राहील,असे उपविभागीय कृषि अधिकारी अलिबाग प्रविण थिगळे यांनी कळविले आहे.

या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असून ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पिक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल. तसेच विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालकांना देऊ नये. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही तसेच मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार सलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टल वरून जमा करण्यात येणार आहे.

   महत्वाचे असे की ह्या योजनेत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के आहे. विमा संरक्षणा साठी रायगड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीची निवड झाली आहे. विमा संरक्षित रक्कम भात पिकासाठी विमा हेक्टरी ६१०००/-असून विमा हफ्ता रक्कम ४५७/- प्रति हेक्टरी आहे

  पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, कीड व रोगांचा प्रादूर्भाव इत्यादी कारणांमुळे पिक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळ साठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळ मधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सम प्रमाणात नुकसान भरपाई अदा केली जाईल.

    खरीप २०२५ च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल/तालुक्यात पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यांस खालील सुत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत प्राप्त उत्पादनास ५० टक्के आणि पीक कापणी द्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

संबंधित पोस्ट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024/ 24-कल्याण लोकसभा मतदारसंघात चौथ्या दिवशी 9 नामनिर्देशनपत्र दाखल

मुंबईतील धारावी विभागात माझी मुंबई स्वछ मुंबई,अभियाना अंतर्गत जी.उत्तर विभाग धारावी मध्ये संगम प्रतिष्ठान चा अनोखा उपक्रम*

vishwatmaklokswamivarta

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला

दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न- ⁠आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ..

vishwatmaklokswamivarta

मोदी सरकारचा 2025 अर्थसंकल्प शेतकरी, महीला, युवा, कामगार, उद्योजकांना उन्नती देणारे व सर्वसामान्य मध्यवर्गीयांना दिलासा देणारे – रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत जाहीर

vishwatmaklokswamivarta