vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोदी सरकारचा 2025 अर्थसंकल्प शेतकरी, महीला, युवा, कामगार, उद्योजकांना उन्नती देणारे व सर्वसामान्य मध्यवर्गीयांना दिलासा देणारे – रावसाहेब पाटील दानवे

मोदी सरकारचा 2025 अर्थसंकल्प शेतकरी, महीला, युवा, कामगार, उद्योजकांना उन्नती देणारे व सर्वसामान्य मध्यवर्गीयांना दिलासा देणारे – रावसाहेब पाटील दानवे

जालना (प्रतिनिधी) : – मोदी सरकारचे यंदाचा 2025 चा अर्थसंकल्प हा शेतकरी, महीला, युवा, कामगार, उद्योजक यांच्या उन्नतीचा असून सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. देशभरातील सर्व क्षेत्रात सर्व राज्यांना सर्व सामावेशक धोरण आखतांना प्रामुख्याने शेती, उद्योग, रोजगार, आरोग्य या सर्व बाबींना चालना देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे.

कृषी क्षेत्राात भरीव तरतूद करुन हे क्षेत्र मजबूत करता येईल यासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना लागू करुन योजनेच्या माध्यमातून कमी उत्पादकता, मध्यम पीक तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेल्या 100 जिल्ह्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. किसान क्रेडीट कार्ड वरील कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

मध्यमवगींय पगारदारांना 12 लाखापर्यंत आयकरात सुट देण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 36 जीवनरक्षक औषधावरील शुल्क कर पुर्णपणे रद्द करण्यात आला आहे, 6 जीवनरक्षक औषधावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली, कॅन्सर वरील उपचाराची औषधी स्वस्त होणार आहे. यामुळे सर्व सामान्य व मध्यमगर्वीयांना याचा मोठा फायदा होणार आहे. देशभरात मोठयाप्रमाणात रोजगार निर्मिती करुन युवकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदीजी व अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे देशभरातून अभिनंदन होत आहे. अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी या वर्षीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पावर दिली

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या 12 स्वयंसेवकांचा-कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नव्या पोलीस मदत केंद्राची उभारणी

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास विभागामार्फत “संविधान दिन” मार्गदर्शन शिबीर

vishwatmaklokswamivarta

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने पी 8-आय विमानातून स्वदेशी ‘एडीसी-150’ एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या घेतल्या यशस्वी चाचण्या

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर