vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

राज्य प्रतिनिधी-सुधारणा आणि पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देत, अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकासाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर पडून कैद्यांना सन्मानाने जीवन जगता यावे आणि भविष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत.

🔸 उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये: कौशल्य प्रशिक्षण: कारागृहातील ६० बंदीवान ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ (संगणक) आणि ३५ बंदीवान ‘सोलार पीव्ही इन्स्टॉलेशन हेल्पर’ (सौर ऊर्जा) प्रशिक्षण घेत आहेत.संयुक्त विद्यमाने: जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जनशिक्षण संस्थान व श्री श्री कौशल्य विकास अहिल्यानगर यांच्या सहकार्याने या अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संकल्पना: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे.

🔸 प्रशिक्षणार्थींना होणारे फायदे:प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कैद्यांना भारत सरकारचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे : शासनाच्या ‘सौरघर योजना’ आणि ‘कुसुम योजनेचा’ लाभ घेता येईल.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकेल.शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सन्मानाने उदरनिर्वाह करण्याचे आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगण्याचे साधन प्राप्त होईल.

कधीकाळी चुकीच्या मार्गाला लागलेले हात आता की-बोर्डवर आणि सौर ऊर्जेच्या उपकरणांवर लीलया फिरत आहेत. बंदीवानांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे

00000

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहितीआपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना…

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

vishwatmaklokswamivarta

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे *पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन…

vishwatmaklokswamivarta