vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड जिल्हा कारागृहातील महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड जिल्हा कारागृहातील महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या…

नांदेड, प्रतिनिधी: राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज नांदेड जिल्हा कारागृहाला भेट देऊन महिला बंदींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. महिला बंदींच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास, मानसिक आरोग्य, कायदेशीर मदत व मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देत त्यांनी विविध सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक संपत आडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, स्वीय सहाय्यक संतोष कुलकर्णी, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, सहाय्यक अधीक्षक व्ही. एस. मेश्राम, दयावंत काळबांडे, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा नरवडे आदी उपस्थित होते.

महिला बंदींशी संवाद साधताना श्रीमती रहाटकर यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी, कारागृहातील सुविधा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्याची आवश्यकता याबाबत विचारपूस केली.

 

यानंतर कारागृह प्रशासन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत महिला बंदींच्या मुलांसाठी कारागृह परिसरात अंगणवाडी सुरू करण्याची शक्यता, महिला बंदींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, ग्रंथालयाची स्थापना, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कलागुणांना वाव देणारे उपक्रम तसेच नियमित समुपदेशनाची व्यवस्था याबाबत त्यांनी चर्चा केली.

महिला बंदींच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मानसोपचार तज्ज्ञांकडून नियमित समुपदेशन व्हावे, सामाजिक कार्यकर्त्यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा भेट देऊन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घ्याव्यात तसेच योग, ध्यान, व्यक्तिमत्त्व विकास, धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल..

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झालं परंतु  उपायुक्त सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी.

vishwatmaklokswamivarta

कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा करण्यास बंदी

भाकरीवाले पाटील महिला स्वयंसहाय्यता समूहाची यशस्वी वाटचाल

विशेष लेख-मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आशेचा किरण..

vishwatmaklokswamivarta

न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव  बैरागी