vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव  बैरागी

न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव  बैरागी

 

मुंबई प्रतिनिधी –

मुंबई- नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मौजे धर्माबाद गावातील देवस्थानाची जमिन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रात्रौच्या वेळेस घरात घुसून जबरदस्तीने शंभर रुपयांच्या कोर्ट स्टॅम्पपेपरवर सही घेऊन जमीन हडप करून ती जमिन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या मावस सासूबाईंची मुले आणि त्या गावातील दलाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आणि प्रशासकीय विभागांना मंगल बैष्णव बैरागी यांनी साकडे घातले आहे. त्यांच्या मागणी न्याय न मिळाल्यास त्या संसद भवन येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

   याबाबत त्यांनी सांगितले की, देवस्थानाची इनामी जमिन त्यांची सासूबाई सुमनबाई विठ्ठलदास बैरागी यांच्या नावे वडिलोपार्जित असताना त्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेऊन ती जमीन बेकायदेशीरपणे विकून टाकली. आणि त्या जमिनीवर अनधिकृतपणे दोन मजली इमारत बांधली आहे. मग, त्या बांधकामाला व जमिन विकण्यास कुणी परवानगी दिली असा प्रश्न त्यांनी विचारला आहे

    सदर अन्यायप्रकरणी न्याय मिळावा यासाठी दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी आझाद मैदान येथे उपोषण केले असता उपोषण मागे घ्यावे याकरिता ७/१२ पत्रकी आमच्या वारसदारांची नोंदी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही त्यांचेवर कारवाई करण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले.

   घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून नवरा अपंग असून मुलगा ही गतिमंद आहे, तरी संबंधित प्रकरणी न्याय दयावा अशी मागणी त्यांनी रडता रडता केली आहे.

संबंधित पोस्ट

जागतिक आदिवासी दिन विशेष..जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख-राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे*

१०० डे ‘ उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार..

पंतप्रधानांनी देशभरातील 47 ठिकाणी 16व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन केले; 51000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वितरण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेद्वारे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे रोजगार मेळ्याचे आयोजन; 450 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

नांदेडच्या भूमीवर होणारा शहिदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta