vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

ठाणे, प्रतिनिधी:- विविध नैसर्गिक आपत्तीमुन्ने पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शंतकत्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीव हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 मध्ये रु.1 प्रति अर्ज भरुन सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात आली. सदर कालावधीत राबविलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करुन, राज्य शासनाने सन 2025-26 या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात भात व नाचणी ही पिके सदर योजनेतर्गत अधिसूचित आहेत. भात व नाचणी पिकासाठी निर्धारित केलेल्या विमा हप्त्याचा शेतकरी हिस्सा अनुक्रमे रक्कम रु.457.50/- व रक्कम रु.87.50/- एवढा विमा हप्ता भरून शेतकऱ्यास विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतहो शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास योजनेमुळे मदत होत आहे.योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये : 1. सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. 2. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, तसेच, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. 3. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. 4. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापेको सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. 5. या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे, तसेच, इतर अवैध मार्गानी विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईन. 6. योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) असणे अनिवार्य असेल. 7. पीक विमा नुकसान भरपाईसाठी. ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील.जोखमीच्या बाबी – योजने अंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे / तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील विमा योजनेत सहभागी होण्याकरिता – अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेच आहे.इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीच स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी.कॉमन सर्विस सेंटर आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.योजनेत सहभागाची अंतिम मुदत – दि.31 जुलै 2025योजना राबविणारी विमा – कंपनी भारतीय कृषी विमा कंपनीई-मेल – pikvima@aicofindia.com कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक – 14447

महत्त्वाच्या नवीन बाबी – या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे. त्याचाच विमा घ्यावा, शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागेल. शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी मध्ये वेळेवर करावी.तरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याकरीत शेवटचे 15 दिवस शिल्लक राहिले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न

कल्याण प्रकरणात मोठा ट्विस्ट! तरुणाने मारहाण करण्याआधी रिसेप्शनिस्टनेच -आरोपीच्या वहिनीला थोबाडीत मारली असल्याचे समोर आले…

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान….राज्य श्रेणीत महाराष्ट्र तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगर पालिका सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन