vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुणे महामेट्रो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना जाहीर-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी सहानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद

 पुणे महामेट्रो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना जाहीर-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी सहानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद

पुणे प्रतिनिधी-पुणे शहरातील मेट्रो प्रवाशांसाठी, पुणे महामेट्रोने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी सहानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. हा निर्णय पुणे महामेट्रोकडून सुरक्षेच्या आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे ऐन दिवाळीत पुणेकरांची गैरसोय होणार आहे.

पुणे मेट्रोचे दोन मार्ग पिंपरी चिंचवड–स्वारगेट आणि वनाज–रामवाडी हे दररोज सकाळी सहा ते रात्री एकरा या वेळेत सुरु असतात. मात्र, लक्ष्मीपूजाच्या दिवशी हे दोन्ही मार्ग सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच सुरु राहतील. सायंकाळी सहा वाजल्यापासून मेट्रोच्या सर्व फेऱ्या थांबतील. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २२ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकानुसार सेवा पुन्हा सुरू होईल.

महामेट्रो प्रशासनाने नागरिकांना आधीच सूचना देत सांगितले आहे की, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करायचा असल्यास तो सायंकाळी सहा वाजेपूर्वी पूर्ण करावा. त्या दिवशी फेऱ्या मर्यादित असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी …

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस