vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आपल्या मराठी भाषेचा गौरव हा वर्षाचे 365 दिवस व्हायलाच हवा – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे पत्रकार सन्मान प्रसंगी विचारधन ..

आपल्या मराठी भाषेचा गौरव हा वर्षाचे 365 दिवस व्हायलाच हवा – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे पत्रकार सन्मान प्रसंगी विचारधन ..

सुरेश गायकवाड यांच्याकडून

मुंबई प्रतिनिधी : मराठी ही आपली मातृभाषा आहे तिचा गौरव केवळ २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच होतो.जो ३६५ दिवस व्हायलाच हवा, असे विचारधन महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार सन्मान सोहळ्यात काढले.

शिवसेना दक्षिण मुंबईच्यावतीने विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन पत्रकार सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत उदय सामंत यांनी पत्रकारांचा शॉल,श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन गौरव केला त्यावेळी त्यांनी आपले विचारधन मांडले.यावेळी व्यासपीठावर पक्ष प्रवक्ते किरण पावसकर, उपनेते एकनाथ शेलार, सुनील नरसाळे, प्रमोद मांडेकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई महानगरपालिकेत वार्तांकन करणाऱ्या तसेच सामाजिक प्रश्नावर वाचा फोडणाऱ्या आणि त्यासाठी प्रसंगी सरकारला धारेवर धरणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनेश मराठे यांनी महानगर पालिकेच्या गलथान कारभाराविरोधात केलेल्या बातम्यांची दखल घेऊन त्यांचाहि यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

  उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना मंत्री उदय सामंत यांनी पुढे म्हटले कि, राज्य मंत्रिमंडळात सध्या महसूल खाते, उद्योग खाते तसेच नगरविकास खात्यांचे मंत्री होण्यासाठी मोठी चढाओढ असली तरी पुढील पाच वर्षांत मराठी भाषा मंत्री होण्यासाठी चढाओढ असेल असा विश्वासहि व्यक्त केला.सध्या या खात्याच्या वतीने १७ देशांशी आमचा कारभार जोडला गेला असला तरी भविष्यात ५० देशांशी या खात्याचा कारभार जोडला जाईल असे उदय सामंत यांनी पुढे म्हटले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ४० लाख झोपडपट्टीतील लोकांचे जीवनमान सुधारावे म्हणून त्यांना मोफत घरे देण्याची घोषणा १९९५ साली केली होती. झोपडी वासियांना घरे देणारी हीच ती एसआरए योजना आहे. पण या झोपड्या वाढत गेल्या त्याला कारण ठरले ते आपलेच मराठी बांधव आहे असे म्हणत रेशनिंग ऑफिस, पोलिस आणि महानगर पालिका येथे काम करणारा मराठी माणूस अमराठीमाणसांना सहकार्यकरीत होता म्हणून मुंबईत झोपड्या वाढल्या आहेत. आपण मराठी भाषिक आहोत आणि आपल्यापासूनच आपल्या मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे.मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरव करावा अशीही सामंत यांनी यावेळी संकल्पना मांडली.प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत मराठीत बोलले पाहिजे मग तुम्ही परदेशात असा किंवा मायदेशात असा यासाठी पत्रकारांनी जनजागृती केली पाहिजे असेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

यावेळी किरण पावसकर यांनी पत्रकार हा समाजमनाचा आरसा असून ज्या काही घटना समाजात घडतात त्याची सविस्तर बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी वृतपत्रात वाचताना हि माहिती अचूक मिळत असते.

पत्रकारांनी निर्भीडपणे असत्यावर आसूड ओढत सत्य समाजासमोर आणले पाहिजे. सरकार,विरोधीपक्ष यांच्यापुढे नागरिकांचे प्रश्न मांडताना आपली लेखणी निर्भीडपणे चालवावी असे म्हणत पत्रकारांना त्यांच्या धाडसी पत्रकारीतेसाठी मनोबल वाढविण्या शुभेच्छा दिल्या.या पत्रकार सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन सुदीप नाईक यांनी केले.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 7शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

बोखारा ग्रामपंचायतीतील  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबईतील बोरिवली येथे “ऋषभायन-२” वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सवाचे ‘वृषभ कला’ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताहाच्या” निमित्ताने कोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन  –प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी….

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीरØ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षणØ अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta