vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

 

( सुरेश गायकवाड )-मुंबई- पवईच्या जयभीम नगरातील हजारो लोकांच्या घरावर बेकायदेशीररित्या कारवाई करून त्यांना बेघर करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवर आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार असल्याचा इशारा युवा भीमसेना संघटनेचे अध्यक्ष विलास माने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

   दि.६ जून २०२४ रोजी मनपाच्या एस विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जयभीम नगरातील झोपड्यांवर कारवाई केली. ही कारवाई करण्यासाठी कुणाही विभागाचे आदेश देण्यात आले नव्हते तरी देखील मानवी हक्क आयोगाचे आदेश आहे असे भासवून येथील रहिवाशांना बेघर केले. त्यामुळे रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली असता कोर्टाने एसआयटी गठीत करून या समितीचे प्रमुख शशी कुमार मीना यांना संबंधित घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितला असता त्यांनी सदर घटनेचा अहवाल न्यायालयात सादर करून संबंधित घटनेसंबंधी महापालिकेकडे कारवाई करण्यासाठी कोणताही ठोस आदेश नव्हता असे अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने एसआयटीला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले तरी देखील एसआयटीने अद्यापही कारवाई केली नाही

त्यामुळे या अन्यायाविरोधात युवा भीमसेना आठवड्यात सरकारला घेराव घालणार असल्याचा इशारा देऊन एसआयटीला न्यायालयात खेचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

जिल्हाधिकारी कार्यालयात सदविचारांचे वाण-सणांद्वारे संवाद आणि संस्कार वृद्धिंगत व्हावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

vishwatmaklokswamivarta

शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर  यांना अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत* नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन * मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांचा बैठकीत निर्धार

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन