vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कौशल्य आत्मसात करा, आत्मविश्वासाने पुढे जा – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर**लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमीतील विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद*उद्योगाभिमुख प्रशिक्षणातून स्थानिक तरुणांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी

*कौशल्य आत्मसात करा, आत्मविश्वासाने पुढे जा – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर**लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमीतील विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद*उद्योगाभिमुख प्रशिक्षणातून स्थानिक तरुणांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी*

गडचिरोली, प्रतिनिधी : बदलत्या औद्योगिक गरजांनुसार आधुनिक कौशल्ये आत्मसात करून तरुणांनी आत्मविश्वासाने रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींकडे वाटचाल करावी. कौशल्य प्रशिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळविण्यासाठी न करता स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठीही करावा, असे प्रतिपादन खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.डॉ. भोयर यांनी रविवारी लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमीला भेट देऊन तेथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रशिक्षणाचा अनुभव, निवडलेले ट्रेड, प्रशिक्षणातून मिळणारी कौशल्ये तसेच भविष्यातील उद्दिष्टांविषयी जाणून घेतले.

संवादादरम्यान डॉ. भोयर यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यामागील प्रेरणा काय होती, येथे आल्यानंतर कोणती नवीन कौशल्ये शिकायला मिळाली आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, याबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी आपण घेत असलेल्या प्रशिक्षणाची माहिती तसेच संबंधित ट्रेडमधील कौशल्यांबाबत त्यांना सांगितले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विषयाचे ज्ञान आणि प्रशिक्षणाबाबतची स्पष्टता याचे डॉ. भोयर यांनी कौतुक केले.

यावेळी त्यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून विविध प्रशिक्षण सुविधा व उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती घेतली. उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांशी सुसंगत प्रशिक्षण तरुणांना मिळाल्यास त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर कौशल्याधारित उद्योजकतेच्या माध्यमातून तरुण स्वतःसह इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना डॉ. भोयर यांनी गडचिरोलीतील तरुणांसाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख संधी निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जिल्ह्यात औद्योगिक विकासासोबतच स्थानिक मनुष्यबळ कौशल्यसंपन्न होणे आवश्यक असून, अशा प्रशिक्षण संस्थांमुळे उद्योगांसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ स्थानिक स्तरावर तयार होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. भोयर यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या पुढाकाराचेही कौतुक केले. गडचिरोलीसारख्या भागात आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्याने स्थानिक युवकांसाठी नव्या संधींचे दालन खुले होत असून, अशा उपक्रमांचा जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनात महत्त्वाचा वाटा राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.००००

संबंधित पोस्ट

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनपी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

आदिवासी उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

vishwatmaklokswamivarta

बँकेत दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी शुक्रवारी महामेळावा- अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ”माझा पैसा माझा अधिकार”- खातेदारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

vishwatmaklokswamivarta

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

कौटुंबिक समस्यांवर चर्चा, तोडग्या साठी,कौटुंबिक न्यायालयाकडून मार्गदर्शन- न्यायाधीश संजश्री घरत-कौटुंबिक न्यायालय कायदा कार्यकम संपन्न