vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

रायगड प्रतिनिधी:-सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यात येणार असून इच्छूकांनी परिपूर्ण अर्ज दि.15 मे 2025 पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण रॉयल ग्रॅन्डीअर बिल्डींग, पहिला मजला, रामवाडी, पेण येथे सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आत्माराम धावे यांनी केले आहे.

या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1 लाख इतकी असावी, इयत्ता 1 ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान झालेला असावा, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला तसेच, अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, आधारकार्डची झेरॉक्स जोडण्यात यावी, विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत, खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.

निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या/पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02143-252519 कार्यालयीन वेळेस संपर्क साधावा.

००००००००

संबंधित पोस्ट

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*— खा.श्रीरंग बारणे*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न*

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चे आज वितरणयशवंतराव चव्हाण केंद्र येथे लोकोपयोगी विविध उपक्रमांचा शुभारंभ

राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

vishwatmaklokswamivarta