vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत दिवाळी पहाटेच्या वेळी ड्रोन व उडत्या आकाश कंदीलांवर बंदी

 मुंबईत दिवाळी पहाटेच्या वेळी ड्रोन व उडत्या आकाश कंदीलांवर बंदी

राज्य प्रतिनिधी -मुंबईत यंदा दिवाळी पहाटला ड्रोन उडवण्यावर आणि उडत्या आकाश कंदीलांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिवाळीच्या दोन दिवस आधी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईत दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतात. या कार्यक्रमांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. या निमित्ताने अनेक मोठ्या कलावंतांचे कार्यक्रम ठेवले जातात. अशावेळी हवेतील उपकरणांमुळे अपघात होऊ शकतात, आग लागू शकते, या उपकारांचा वापर करून काही समाजकंटक कलावंतांना व्हीव्हीआयपी लोकांना धोका पोहोचू शकतात आणि यामुळे सार्वजनिक व्यवस्था बिघडू शकते. अशा कार्यक्रमांना प्रचंड तरुणाई उपस्थित असते. अशावेळी कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आता ड्रोन आणि हवाई कंदील दिवाळी पहाट दरम्यान दिसणार नाहीत.

नियमाची अंमलबजावणी दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. सात ऑक्टोबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट, एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर, पॅरामोटर, हॅन्ड ग्लायडर, हॉट एअर बलून उडवण्यास पूर्ण बंदी राहील. बारा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या तीस दिवसात हवेत उडणारे कंदील वापरणे, त्यांचा साठा करणे किंवा त्यांची विक्री करणे यावर बंदी असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी धोकादायक पद्धतीनेपेक्षा सुरक्षित आणि शांततापूर्ण उत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन नियमांचं काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाने केले आहे.

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई- नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता*‘प्लास्टिकक्त नवी मुंबई’साठी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेचा विशेष उपक्रम*

महाराष्ट्र शासनाचे २८ वर्षे मुदतीचे८०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवभाव…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री कार्यालय(जनसंपर्क कक्ष)महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी