vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले

शालेय क्रीडा प्रकारातील ४४ खेळांना क्रीडा गुणांची सवलत देण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले, खेळांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याबरोबरच सुदृढ आणि निरोगी राष्ट्रनिर्मितीस हातभार लागतो. राज्यातील विविध शाळा शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय अनेक क्रीडा प्रकार आणि स्पर्धांचे आयोजन करतात. या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची योग्य दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय गुणांकनामध्ये क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत संबंधित विभागांनी सकारात्मक कार्यवाही करावी.

महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेच्या मागणीनुसार, विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीतील चार लाखांहून अधिक विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळावा तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रीडा सवलतीचे गुण देण्याची मागणी संस्थेने केली आहे.

बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव रुपाली सावंत, क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी कुणाल सरपाते, शालेय शिक्षण विभागाचे सहायक कक्ष अधिकारी दारासिंग दुल्हत, महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले, विविध विनाअनुदानित शालेय खेळांचे प्रशिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

राहाता तालुक्यात ‘महाराजस्व अभियान शिबिर’ उत्साहात संपन्न,एकाच छताखाली शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सामाजिक न्याय दिन साजरा घर घर संविधान योजनेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta