vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण .

चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधी गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवालात ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ असा झालेला उल्लेख अनावधानाने झाला असल्याचे नागपूर शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संबंधित उल्लेख चुकीचा असून, प्रत्यक्षात ‘जॉईंट कमिशनर व इतर, एक्साईज विभाग’ असा उल्लेख अभिप्रेत असल्याचे पोलिसांच्या अंतिम अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक, सा. सु. वि. गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांना दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सादर केलेल्या पत्रात, गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे दाखल तक्रार अर्जाच्या चौकशीअंती ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर’ दोषी आढळल्याचे नमूद करण्यात आले होते.

या उल्लेखाच्या अनुषंगाने पुढील स्तरावर सविस्तर चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर केलेल्या अहवालात या बाबत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. सामाजिक सुरक्षा कक्षाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांकडे चौकशीसाठी देण्यात आलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशी अहवालात ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ असा उल्लेख अनावधानाने झाला होता. हा उल्लेख चुकीचा असून, प्रत्यक्षात ‘जॉईंट कमिशनर व इतर, एक्साईज विभाग’ असा उल्लेख असणे अपेक्षित होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या ‘एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका’ या वृत्ताबाबत नागपूर शहर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. सदर वृत्त उपलब्ध अधिकृत चौकशी अहवालातील वस्तुस्थितीशी सुसंगत नसून, चौकशी अहवालातील चुकीच्या उल्लेखामुळे गैरसमज निर्माण झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

सेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांकडून शहरातील विकासकामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

vishwatmaklokswamivarta