vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी

पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी

सातारा प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. चालू वर्ष २०२५-२६ साठीची ही ई-केवायसी मोहीम पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशांनी त्वरीत ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे

लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्र (CSC Center) वर जाऊ शकतील, तसेच शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याव्दारे ई-केवायसी पूर्ण करू शकतील.

वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना हालचाली संबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करतील. जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती. फरांदे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन; तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना..

एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायप्रस राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मुंबईत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा हॉटेल ताज पॅलेस येथे पारंपरिक लोककलांचा जागतिक मंचावर होणार देखणा आविष्कार

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हाप्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा

vishwatmaklokswamivarta

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव