vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हाप्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हाप्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- सेवा हमी कायदा २०१५ च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आता नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सेवांसंबंधित माहिती ही व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ९९६७२००९२५ हा क्रमांक जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

     सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांना सेवा सुलभरित्या देता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ९९६७२००९२५ हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला असून त्याद्वारे व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे नागरिकांना सेवा देण्यात येणार आहे. या सेवांमध्ये महा ई सेवा केंद्रांचे ठिकाण, वेळा, थेट अर्ज करण्याची लिंक, सर्व सेवांची माहिती, विविध महसूल सेवांसाठी लागणारी कागद पत्रांची यादी, तक्रार दाखल करण्याचे ठिकाण, सेवांसाठी कोठे अर्ज करावा याबाबतची माहिती तसेच घरपोच सेवा हवी असल्यास त्याबाबत विनंती करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

  माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे चॅट बॉट विकसित केले असून ते पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारीत आहे

संबंधित पोस्ट

दिव्यांगांना कृत्रिम पायांचे वाटप; पुनर्वसन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार होणार  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

विशाखापट्टणम इथं #BRICS युवा मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रिक्स युवा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. बैठकीत ब्रिक्स देशांमधील युवा सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसंच तरुणांसाठी शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, नवोन्मेष आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी

पर्यटकांसाठी सूचना-“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट”या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…

महिला सक्षमीकरणाबाबतीत कोणतीही तडजोड नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी