vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांगांना कृत्रिम पायांचे वाटप; पुनर्वसन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार होणार  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

दिव्यांगांना कृत्रिम पायांचे वाटप; पुनर्वसन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार होणार

                                                     – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

जालना, प्रतिनिधी: जालना शहरातील गांधी चमन येथील महिला रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून लाभार्थ्यांना कृत्रिम पायांचे वितरण केले. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना नव्याने चालण्याचा आधार मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पुनर्वसन केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच त्यांनी केंद्राच्या परिसराची पाहणी करून दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार असून, केंद्रासमोर दिव्यांगांसाठी सुसज्ज, सुरक्षित आणि आकर्षक उद्यान विकसित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. रेल्वे स्थानक आणि बसस्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना येथे सहज पोहोचता येईल आणि विविध पुनर्वसन सेवांचा अधिक प्रभावी लाभ घेता येईल.

त्यांनी पुढे सांगितले की, दिव्यांग नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, पुनर्वसन केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येतील. दिव्यांगांच्या पुनर्वसनाबरोबरच त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात कृत्रिम पाय मिळालेल्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. पुनर्वसन केंद्राच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित दिव्यांग, त्यांचे पालक तसेच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद,एकाच दिवसात हजारो महसुली प्रकरणांचा निपटारा

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना, बांधकाम, टर्फ निष्कासित करण्याची कारवाई सुरू*

केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थींना द्यावा- खासदार विशाल पाटील- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अफीडेव्हीट / नोटरीची अट रद्द करा.काँग्रेस माथाडी कामगारचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी घाटी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले 

स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार आयटीआयमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू करा – ना. मंगल प्रभात लोढा जिल्हा नियोजन भवनात अल्पकालीन अभ्यासक्रमांचा आढावा

vishwatmaklokswamivarta