vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

७.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

७.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

मुंबई, प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ अदत्त शिल्लक रकमेची १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ११ सप्टेंबर २०२६ रोजी ( १२, १३ आणि १४ सप्टेंबर,२०२६ हे अनुक्रमे शनिवार,रविवार आणि सुटी असल्याने ) सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर १४ सप्टेंबर २०२६ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४ (३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ७.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली, असे यथोचितरित्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत. भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यासाठी लोकचळवळ आवश्यक- गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अजित दादांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

आज १७ ते २० मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे