vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज १७ ते २० मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

आज १७ ते २० मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे..

मुंबई, प्रतिनिधी : 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

17 मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. 21 मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होण्याचे संकेत आहेत.

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. तसेच बाजार समित्यांमध्ये आणलेले धान्य व इतर कृषीमाल पावसापासून सुरक्षित राहील यासाठी त्यावर ताडपत्री किंवा अन्य संरक्षणात्मक आच्छादन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग देण्यासाठी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज एक आढावा बैठक

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू   – उपमुख्यमंत्री अजित पवार- विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश- प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे- डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…