vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग देण्यासाठी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज एक आढावा बैठक

अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग देण्यासाठी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज एक आढावा बैठक…

राज्य प्रतिनिधी-आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग देण्यासाठी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज एक आढावा बैठक घेतली. राज्य शासनाचे अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते

एनएचएआयच्या अखत्यारितील एनएच 44 महामार्गावरील जम्मू श्रीनगर या 228 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या यात्रा मार्गात समाविष्ट भागाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.

रस्त्याची स्थिती, लेनच्या खुणा, रस्ता सुरक्षा उपाय तसेच पुरेशा मनुष्य बळासह जलद कृती दलाची नेमणूक यांच्या तयारीचा आढावा घेणे हा या बैठकीचा उद्देश होता. याशिवाय यात्रेदरम्यान खराब हवामानमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी यंत्रांच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला.

या बैठकीत एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांनी भाविक आणि प्रवासी दोघांच्याही आराम व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. स्थानिक प्रशासनासोबत काम करुन यात्रेच्या तयारीसाठी त्यांना मदत करावी असे आदेश त्यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिले.

यात्रेच्या तयारीचा एक भाग म्हणून एनएचएआयने रामबन आणि अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी क्वाझीगुंड एक्सप्रेसवे प्रा. लि. च्या माध्यमातून पाच रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.

अमरनाथ यात्रा तयारीच्या आढावा बैठकीत विविध सरकारी यंत्रणांमधील सहकार्याची भावना दिसून आली. अमरनाथ यात्रेकरुंची यात्रा सुरळीत, सुरक्षित आणि विनासायास पार पडावी यासाठीची एनएचएआयची वचनबद्धताही बैठकीत अनुभवाला आली

संबंधित पोस्ट

तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली साताऱ्याच्या अभिमान!

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू. कवड यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या तीर्थस्थळांवर गंगा नदीचे पवित्र पाणी आणण्यासाठी जातात.

ग्रंथ पूजनाने ठाणे ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनामका खरेदीकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी…

vishwatmaklokswamivarta

मोर्शी उपविभागात ‘सेवा पंधरवाड्या’चे यशस्वी आयोजन