vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोर्शी उपविभागात ‘सेवा पंधरवाड्या’चे यशस्वी आयोजन

मोर्शी उपविभागात ‘सेवा पंधरवाड्या’चे यशस्वी आयोजन

      अमरावती, प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत मोर्शी उपविभागात सेवा पंधरवाड्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत हा पंधरवाडा राबविण्यात आला. त्यानुसार, मोर्शी आणि वरुड तालुक्यांमध्ये हा ‘सेवा पंधरवाडा’ यशस्वीपणे पार पडला.   सेवा पंधरवाड्यांतर्गत तीन टप्प्यांमध्ये विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात पाणंद रस्त्यांची मोहीमेत ८७ रस्त्यांची पाहणी करून २५ पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले. या पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात आली

     दुसरा टप्प्यात सर्वांसाठी घरे उपक्रमात घरे बांधण्यासाठी शासकीय जमीन कब्जे हक्काने देणे आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमांनुसार नियमित करून घरकुल लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली. या अंतर्गत ग्रामीण भागातील ५४ आणि नगर परिषद वरुड अंतर्गत २७ अशा एकूण ८१ घरकुल लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून देण्यात आले. नगर परिषद वरुड अंतर्गत १२३ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची तपासणी सध्या सुरू आहे.   आदिसेतू अभियानात मंडळ स्तरावर १६ छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर नागरिकांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ देण्यात आला.गाव तिथे स्मशानभूमी मोहीमेत २१ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले.

जिवंत सातबारा मोहीमेत मृत व्यक्तीचे नाव कमी करून नियमानुसार वारसांचे नाव लावणे आणि सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी करण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच नाविण्यपूर्ण योजनेत जनसंवाद अभियानांतर्गत २५ गावांमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनसंवाद अभियान राबवले आणि ग्रामस्थांच्या स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. लेखन त्रुटीतील आदेश पारित करण्यात आलेल्या ४०० प्रकरणांची तपासणी करण्यात आली.

      अभियानासाठी उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, मोर्शी तहसिलदार सागर ढवळे, वरुड तहसिलदार रामदास शेळके, तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

00000

संबंधित पोस्ट

महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वात युवा चेहरा कुमारी स्नेहा कासारे धारावीच्या प्रभाग क्रमांक 186 मध्ये भरणार फॉर्म…

vishwatmaklokswamivarta

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण

भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून सहकारसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न