vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकरी हिताला प्राधान्य, 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात!

शेतकरी हिताला प्राधान्य, 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात!

राज्य प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊस गाळप हंगाम 2026-27 धोरणासंदर्भात मंत्रीसमितीची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील ऊस उपलब्धता, गाळपाचे नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊसदर तसेच साखर कारखान्यांसमोरील विविध आर्थिक व तांत्रिक बाबींचा या बैठकीत सविस्तर आढावा घेऊन शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा समतोल साधून आगामी गाळप हंगामाचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा समतोल साधून गाळप हंगामाचे नियोजन

2025-26 च्या गाळप हंगामाचा आढावा, देशातील साखर साठा, थकीत एफआरपी व आरआरसी, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल पुरवठा, ऊस क्षेत्र व उत्पादन, साखर निर्मिती तसेच 2026-27 च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी, हंगामनिहाय एफआरपी व एमएसपी, साखर उद्योगाशी संबंधित शासनाच्या विविध उपक्रमांसाठी कारखान्यांकडून करण्यात येणाऱ्या कपातीचे धोरण आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या निधी कपातीचा आढावा, प्रलंबित देणी भागविण्यासाठी सॉफ्ट लोन योजनेवरील व्याज अनुदान सुरू करणे, ज्या साखर कारखान्यांचे सहवीज निर्मिती प्रकल्पांशी संबंधित वीज खरेदी करार संपुष्टात आले आहेत, अशा कारखान्यांना 2023-24 च्या हंगामाप्रमाणे प्रति युनिट ₹1.50 सबसिडी देणे, साखर पॅकिंगसाठी ज्युट बॅगची सक्तीची अट शिथिल करणे, सीबीजी निर्मिती प्रकल्पांना आर्थिक व तांत्रिक प्रोत्साहन देणे, ऊस उत्पादन वाढीसाठी विशेष ऊस विकास योजना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित ऊस वाण, रोपवाटिका, ऊस बेणे प्रक्रिया, ठिबक सिंचन, रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित वापर, आधुनिक ऊस लागवड पद्धती आणि यांत्रिकीकरण यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष ऊस विकास योजना लागू करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले.

केंद्राकडे प्रलंबित विषयांबाबत शिफारस,साखर उद्योगासंदर्भातील केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये साखरेच्या किमान विक्री किंमतीत वाढ करणे, इथेनॉलच्या दरात वाढ करणे तसेच इथेनॉल प्रकल्पांना प्रलंबित व्याज अनुदान तातडीने उपलब्ध करून देणे, या मागण्यांसाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पोलीस शहीद दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली.

vishwatmaklokswamivarta

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

मुंबईतील पुनर्विकासाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या जमिनींवरील प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक – उपसभापती सचिन अहिर