vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजना…

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजना

राज्य प्रतिनिधी-   प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी आणि अन्य प्रवासी वाहन चालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांना सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या चालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. या मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या रक्कम रूपये 10 हजारांचा सन्मान निधीचा सांगली जिल्ह्यातील ६५ वर्षापुढील वय असणाऱ्या ३१ चालकांना लाभ झाला असून, हे मंडळ प्रवासी वाहतूक चालकांसाठी सामाजिक सुरक्षेचा आधार ठरत असल्याची भावना संबंधितांनी व्यक्त केली.      सन्मान निधीबरोबरच या मंडळामार्फत चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जीवन विमा, अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि कौशल्यवृद्धी अशा विविध योजनांचा त्यामध्ये समावेश आहे.

मंडळाची स्थापना-     राज्यातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने १६ मार्च २०२४ रोजी मंडळ स्थापनेचा शासन निर्णय झाला. पुढे २० ऑगस्ट २०२४ रोजी मंडळाला ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ असे नाव देण्यात आले. ३ जुलै २०२५ च्या शासन शुद्धीपत्रकाद्वारे मंडळाच्या मुख्यालयाबाबत तसेच राज्य व जिल्हास्तरीय रचनेबाबत सुधारणा करण्यात आली. राज्य शासनाने या मंडळासाठी ५० कोटी रुपयांचे एकवेळचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण पद्धतीने कार्यरत राहावे, हा त्यामागील उद्देश आहे.

ज्येष्ठ चालकांसाठी सन्मान निधी-      मंडळाने दीर्घकाळ प्रवासी वाहतूक क्षेत्रात सेवा बजावलेल्या ज्येष्ठ चालकांसाठी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १ जून २०२६ पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील 31 सभासदांच्या खात्यावर सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे.

     सांगलीतील शाहीर दत्तात्रय खराडे हे गेली 55 वर्षे रिक्षा व्यवसाय करतात. सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नोंदणी केली. आता त्यांच्या खात्यात 10 हजार रूपये सन्मान निधी मिळाला आहे. यासाठी त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.       मिरजमधील प्रभाकर आप्पाजी खाडे हे 1981 पासून रिक्षा चालवतात. सांगली जिल्हा रिक्षा संघटनेच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सन्मान निधीसाठी अर्ज केला. योजनेतून त्यांच्या खात्यात 10 हजार रूपये सन्मान निधी मिळाला आहे. यासाठी त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

चालकांसाठी अन्य विविध कल्याणकारी योजना,जीवन विमा व अपंगत्व विमा योजना – कर्तव्य बजावताना चालकाला दुर्दैवी घटना घडल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी विमा संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.आरोग्यविषयक लाभ योजना – चालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय लाभांसाठी योजना राबविण्यात येत आहे.

कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य – प्रवासी वाहतूक सेवा बजावताना चालकाला दुखापत झाल्यास पात्रतेनुसार आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.

पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – चालकांच्या मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहेत.

कामगार कौशल्यवृद्धी योजना – चालकांचे कौशल्य वाढविणे, आधुनिक वाहतूक व्यवस्थेशी त्यांना जोडणे आणि त्यांच्या व्यावसायिक क्षमतांचा विकास करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. (Maharashtra Government⁠)

चालकांनी सदस्यत्व घेणे आवश्यक,मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र चालकांनी मंडळाचे सभासदत्व घेणे महत्त्वाचे आहे. सभासदत्व व योजनांशी संबंधित अद्ययावत माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे

अधिकृत संकेतस्थळ :धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ⁠https://ananddighekalyankarimandal.orgअधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

(संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)

00000

 

 

संबंधित पोस्ट

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

लेख : सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !- संस्था-सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेबीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडूनचार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार 

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध

उच्च न्यायालयात सिंहगडएक्स्प्रेसच्या थांब्यासाठी-अशी मागणी पुणे प्रवासी संघाने केली