vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

संरक्षण मंत्र्यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा, वाढत्या औद्योगिक सहकार्यावर भर देत संरक्षण संबंध वाढविण्याबाबत चर्चा

संरक्षण मंत्र्यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा, वाढत्या औद्योगिक सहकार्यावर भर देत संरक्षण संबंध वाढविण्याबाबत चर्चा.

विदेश प्रतिनिधी-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांच्यात 1 जुलै 2025 रोजी दूरध्वनीवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रातील दीर्घकालिन सहकार्य, प्रशिक्षण आणि लष्करी सराव यासह औद्योगिक सहकार्य वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली. ही महत्त्वाची आणि परस्परांच्या हिताची भागीदारी आणखी वाढवण्याबाबत त्यांनी सहमती दर्शविली. परस्परसंवाद, संरक्षण पुरवठा साखळीचा समावेश, लॉजिस्टीक भागीदारी, संयुक्त लष्करी सरावात वृद्धी आणि समविचारी भागीदारांसोबत सहकार्य अशा मुद्द्यांचा चर्चेत समावेश होता.

भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात विनासंकोच पाठिंबा दिल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेचे आभार मानले. अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वात भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्याला गती मिळून ते नवीन उंचीवर पोहोचले आहे अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची प्रशंसा केली. द्विपक्षीय संरक्षण भागीदारी पुढे नेण्यासाठी, पीट हेग्सेथ यांनी राजनाथ सिंह यांना अमेरिकेत येण्याचे व प्रत्यक्ष भेटीचे निमंत्रण दिले.

एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारत अमेरिकेतील संरक्षण भागीदारी वाढविणे आणि क्षमता बांधणीतील सहकार्य मजबूत करणे यादृष्टीने सध्या सुरू असलेल्या तसेच नवीन उपक्रमांचा आढावा या चर्चेत घेण्यात आला. लवकरच अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावर्षी जानेवारी महिन्यात पीट हेग्सेथ अमेरिकेचे संरक्षण मंत्री झाल्यानंतरची ही दोन्ही नेत्यांमधील तिसरी दूरध्वनीवरील चर्चा होती

 

संबंधित पोस्ट

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

vishwatmaklokswamivarta

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षण धोरण विषयक चर्चेचे 10 वे सत्र नवी दिल्लीत संपन्न

कोलंबियात भीषण विमान अपघातात ६६ जणांचा मृत्यू, ४८ जणांना वाचवण्यात यश.

बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर आता वझिरिस्तानमध्येही स्वतंत्र राष्ट्रासाठी आंदोलन सुरू

रशियामध्ये भारताच्या पवित्र बुद्ध अवशेषांचे 50,000 हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन- रशियामध्ये अभूतपूर्व आस्थेचे वातावरण भारताकडून पाठवण्यात आलेले पवित्र अवशेष एलिस्ता येथील प्रतिष्ठित गेडेन शेद्दुप चोइकोरलिंग मठात

vishwatmaklokswamivarta